सावद्यातून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तापी नदीत आढळला
सावद्यातून बेपत्ता तरुणाचा मृतदेह तापी नदीत आढळला
यावल, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :-
सावदा शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह यावल तालुक्यातील बोरावलजवळील तापी नदीच्या पात्रात आढळून एकच खळबळ उडाली आहे.
सावदा शहरातील साळीबाग भागातील अजय सुधाकर फाटके (वय ३८) हा दि. २५ ऑगस्ट रोजी "फैजपूर येथे कापड दुकानात जात आहे" असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्याबाबत सावदा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
दरम्यान, दि. २६ ऑगस्ट रोजी भुसावळजवळील तापी नदीच्या पुलावर त्याची दुचाकी उभी आढळून आली होती. स्थानिक नागरिकांनी "फाटकेंनी पुलावरून उडी घेतली असावी" असा संशय व्यक्त केल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
बुधवारी अखेर बोरावल (ता. यावल) परिसरातील तापी नदीत त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलवून शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत