Contact Banner

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून केळी उत्पादकांसाठी रावेर येथे वैज्ञानिक केंद्राची घडामोड

 

Development of a scientific center for banana growers at Raver under the initiative of Amolbhau Javale


आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून केळी उत्पादकांसाठी रावेर येथे वैज्ञानिक केंद्राची घडामोड

लेवाजगत न्यूज, रावेर (प्रतिनिधी):
रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, आणि सल्ला सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये "केळी तंत्रज्ञान प्रसार केंद्र" स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून, त्याच्या अनुषंगाने तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीसाठी भालोद येथील केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद (जळगाव) चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, तसेच तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक दहात यांनी भेट दिली. त्यांनी प्रस्तावित केंद्राच्या गरजा, उद्दिष्टे व कार्यपद्धतीबाबत सविस्तर चर्चा केली.

या चर्चेमध्ये केळी पिकावरील पनामा रोग, त्याचे नियंत्रण व प्रतिबंधक उपाय, तसेच भविष्यातील संशोधन दिशा यावर विशेष भर देण्यात आला. यासोबतच आधुनिक शेती प्रयोग, बियाणे निर्मिती, पीक सल्ला, तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन, आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही सखोल चर्चा झाली.

"शेतकरी संवाद कार्यक्रम" या उपक्रमांतर्गत, यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या परिसरात दर महिन्याच्या एका गुरुवारी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञ शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून, विविध पिकांवरील अडचणी, नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि सल्ला देणार आहेत.

या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश रावेर मतदारसंघातील केळी उत्पादकांना वैज्ञानिक पद्धतीने सक्षम करणे, त्यांना योग्य माहिती व सल्ला वेळेवर उपलब्ध करून देणे, उत्पादन वाढवणे आणि तंत्रज्ञानाच्या आधारे शेती अधिक शाश्वत व फायदेशीर बनवणे हा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.