Contact Banner

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस उत्साहात साजरा


Dr. Ulhas Patil English Medium School Savda World Scout Scarf Day celebrated with enthusiasm



डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा

जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस उत्साहात साजरा

लेवाजगत न्यूज, सावदा (प्रतिनिधी):
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा येथे जागतिक स्काऊट स्कार्फ दिवस उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन उपस्थित होत्या. तसेच प्रमुख शिक्षक सौरभ तेली व संगीता ठोंबरे यांचीही विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईडच्या विद्यार्थिनी पलक पाटील आणि याशिका गुळवे यांनी तर प्रास्ताविक गाईड शिक्षिका कल्पना वाणी यांनी केले. गाईडच्या विद्यार्थिनींनी "बेडल पॉवेल तेरे बच्चे हम" हे गीत सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला.

जागतिक स्कार्फ दिवसाचे महत्त्व शिक्षक सौरभ तेली यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थिनी आर्या भोला आणि लोकिता बोंडे यांनी प्रभावी भाषणांद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन स्काऊट प्रशिक्षक प्रशांत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमासाठी फलक लेखनाची जबाबदारी कला शिक्षक खिलेश राणा आणि कांचन महाजन यांनी पार पाडली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.