Contact Banner

स्वातंत्र्यदिनानिमित्त सावद्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा आनंद – आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण

 

Distribution of houses under the Prime Minister's Housing Scheme by MLA Chandrakant Patil on the occasion of Independence Day


स्वातंत्र्यदिनानिमित्त सावद्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा आनंद – आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण 

लेवा जगत न्यूज सावदा -आज सकाळी स्वातंत्र्यदिनानिमित्त सावद्यात सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात आमदार मा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गृहप्रवेश प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा व सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपस्थित होते. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना बांधकाम परवानग्यांचेही वाटप करण्यात आले.

मान्यवरांनी योजनेंमुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात होत असलेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. lewajagat news आतापर्यंत १८४ लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले असून, यापैकी आज पाच लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना बांधकाम परवानग्या देऊन त्यांच्या स्वप्नातील घराच्या प्रवासाची सुरुवात झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.