Contact Banner

फुंडे महाविद्यालयात जागतिक अंगदान/अवयवदान दिन साजरा

 फुंडे महाविद्यालयात जागतिक अंगदान/अवयवदान दिन साजरा

Phuṇḍē-mahāvidyālayāta-jāgatika-aṅgadāna-avayavadāna-dina-sājarā



लेवाजगत न्यूज उरण:सुनिल ठाकूर  -दिनांक-१४ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण आरोग्य केंद्र उरण यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक अंगदान/अवयवदान' सप्ताहाच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.डॉ.कविता भगत,वैद्यकीय अधिकारी कोप्रोली यांनी आपल्या मनोगतात व्यक्तीने अंगदान/अवयवदान का केले पाहिजे याविषयी अत्यंत महत्वाची व उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्तीच्या शरीरात असणारे अवयव आणि मृत्यूनंतर त्यांचे दान कसे केले जाते,तसेच मृत्यूपूर्वी आपण आपले कोणकोणते अवयव दान करू शकतो.भारतासारख्या खूप लोकसंख्या असणाऱ्या देशात शस्त्रक्रिया दरम्यान अपघाता दरम्यान बऱ्याच व्यक्तिंना वेगवेगळ्या अवयवांची आवश्यकता असते,अशा वेळी अवयव दात्यांनी दान केलेले अवयव त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात.जगामध्ये १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अंगदान/अवयवदान म्हणून साजरा केला जातो,तसेच १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या पंधरवड्यात अवयवदान याविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येते.भारतात मात्र डॉ.वेणूगोपाल राव यांनी दिल्ली येथील AIMS रुग्णालयात ३ ऑगस्ट रोजी पहिली अवयव रोपण शस्त्रक्रिया केली,तेव्हापासून भारतात अवयवदान अथवा अवयवरोपन दिन म्हणून साजरा केला जातो.व्यक्तीच्या शरीरातील सर्वच अवयव दान करता येतात अगदी त्वचा सुद्धा दान करता येते.

डॉ.राजेंद्र इटकर,तालुका आरोग्य अधिकारी उरण यांनी आपल्या मनोगतातून अंगदान अथवा अवयवदान याविषयी समाजात असणारे समज-गैरसमज यावर प्रकाश टाकला.व्यक्तीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव कोणाच्या तरी उपयोगी पडले पाहिजेत,आणि म्हणतात ना 'मरावे परी कीर्ती रुपी उरावे' 'तसेच मरावे परी अवयवदान रुपी उरावे' असेही म्हणता येईल.संतोष परदेशी यांनी आरोग्य प्रतिज्ञा वाचली.डॉ.आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य यांनी यांनी आपल्या मनोगतातून अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे,याविषयी चर्चा केली.विद्यार्थ्यांनी समाजात अंगदान/अवयवदान याविषयी जनजागृती केली पाहिजे.आपल्या मनोगतातून त्यांनी रक्तशय या आजाराचे रुग्ण जैन,गुजराती अशा शाखाहारी समाजात प्रमाण जास्त होते,आता ते आगरी समाजात सुद्धा वाढले आहे,कारण आहारात झालेला बद्दल.कार्यक्रमाचे आभार प्रो.डॉ.अनिल पालवे यांनी मानले,डॉ.श्रेया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पूजा पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी, शरद घाटगे,आरोग्य सहायक,सुनील म्हात्रे तालुका आरोग्य सेवक उपस्थित होते.प्रा.राम गोसावी,प्रा.गजानन चव्हाण,प्रा.प्रांजल भोईर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे,राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.