डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपक्रम
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपक्रम
लेवाजगत न्यूज सावदा – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमात कला शिक्षक श्री. उमेश बढे यांनी विद्यार्थ्यांसमोर शाडू मातीपासून आकर्षक व सुबक गणेश मूर्ती घडविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांना कला शिक्षिका सौ. कांचन महाजन आणि कला शिक्षक श्री. खिलेश राणा यांनीही मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा व कलात्मकतेचा वापर करून लहान–मोठ्या आकारांच्या सुंदर मूर्ती तयार केल्या. या निमित्ताने पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना नकार द्यावा आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कलानैपुण्य खुलून आले तसेच पर्यावरण संवर्धनाचे भान अधिक दृढ झाले. शाळेच्या शिक्षकवृंदांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत