Contact Banner

धामण सापाची ११ पिल्ली अंड्यातून आली बाहेर

 

धामण सापाची ११ पिल्ली अंड्यातून आली बाहेर


धामण सापाची ११ पिल्ली अंड्यातून आली बाहेर


लेवाजगत न्यूज उरण : सुनिल ठाकूर -दिनांक ३ जून २०२५ रोजी पनवेल बस स्थानक जवळील स्टड व्हीन बिल्डिंग मधून विक्रम कैया यांचा नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल या संस्थेचे कार्यकर्ते शार्दूल वारंगे यांना बिल्डिंगमध्ये पार्किंगच्या आवारात साप असल्याचे फोन वरून कळविले, तो साप पकडून निसर्गात सोडण्यासाठी शार्दूल वारंगे त्या ठिकाणी पोहचले. परंतु तो साप तिथे दिसत नसल्याने सर्व बाजूला शोध मोहिम चालू केली असता साप परत दिसला नाही. परंतु त्या ठिकाणी सापाची १४ अंडी दिसून आली. तिथल्या लोकांनी भीतीपोटी ती अंडी तिथून हलविण्यास सांगितली.  पुढे ती सर्व अंडी वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS) पनवेल या संस्थ्येच्या प्रथमोपचार व पुनर्वसन केंद्रात पुढील प्रक्रियासाठी आणली.

वरील १४ अंड्यांतून दिनांक १५ ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये धामण या सापाची ११ पिल्ली वेवस्थितरीत्या बाहेर आली. वरील सर्व धामण सापाच्या पिल्ल्यांना दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी वनविभागच्या मार्गदर्शनानुसार संस्थ्येचे अध्यक्ष श्री. संतोष उदरे,  कार्यकर्ते बाबू शेख, आर्यन उदरे व वनरक्षक अमोल लाड यांच्या समक्ष  निसर्गात सोडून देण्यात आले. 

संतोष उदरे : धामण साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण तो बिनविषारी असतो आणि शेतीतील उंदीर, घुशी आणि इतर उपद्रवी प्राणी खाऊन पिकांचे संरक्षण करतो. या सापाच्या मदतीने शेतकरी प्राण्यांचा बंदोबस्त न करता पिकांचे नुकसान टाळू शकतात, त्यामुळे तो शेतीसाठी एक मौल्यवान सहयोगी आहे. तसेच धामण साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.