Contact Banner

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

Flag hoisting ceremony on the occasion of Independence Day by Guardian Minister Gulabrao Patil


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा



    लेवाजगत न्यूज जळगांव- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम शुक्रवारी , 15 ऑगस्ट, 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

            या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता यांनी उपस्थित राहावे.

             यादिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्यानंतर आयोजित करावा. असे  जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव   यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.