अंबरनाथमध्ये १५ ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अंबरनाथमध्ये १५ ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
लेवाजगत न्यूज अंबरनाथ – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे संचलित युवा समिती, अंबरनाथ शहर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत डॉ. वृषाली रितेश भारंबे यांच्या क्लिनिक, आदित्य मातृछाया अपार्टमेंट, भक्तीशक्ती चौक, वडवली सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) येथे होणार आहे.
शिबिरामध्ये शरीराची तपासणी, वजन वाढवणे किंवा कमी करण्याबाबत मार्गदर्शन, तसेच योगासंबंधी सल्ला दिला जाणार आहे. सर्व तपासण्या व सल्ला सेवा पूर्णपणे मोफत असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
या उपक्रमाचे आयोजन नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती तर्फे मयुरेश कोल्हे, प्रशांत पाटील, किरण नेमाडे, भारत महाजन आणि स्मिता चौधरी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ९६६५०८०४११, ९०२८२२८२९९, ९२७०१४५८६६, ९९२१५७९०५७.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत