जर्मनीत रंगणार सांस्कृतिक महोत्सव.....श्री तुळशीबाग मंडळाचा उपक्रम.......
जर्मनीत रंगणार सांस्कृतिक महोत्सव.....श्री तुळशीबाग मंडळाचा उपक्रम.......
उरण:सुनिल ठाकूर -
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जर्मनी येथील फ्रॅन्कफर्ट येथे नमस्ते लांगेन या मंडळाच्या सहकार्याने
गणेशोत्सव तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे......
नोकरी व्यवसाय निमित्त परदेशात राहणारे आपल्या भारतीय बांधवांना आपल्या गणेश उत्सवात सहभागी होऊन त्याचा आनंद मिळावा तसेच आपली संस्कृती परदेशातील लोकांपर्यंत पोहचावी या
हेतूने श्री तुळशीबाग मंडळाने नृत्य, गायन, विविध गुणदर्शन असा सुर संगम हा सांस्कृतिक कार्यक्रम करणार असून सदर कार्यक्रमात गायक जितेंद्र भुरुक यांचा सोल्फुल किशोर कुमार तसेच राजेश दातार प्रज्ञा देशपांडे यांची मराठी हिंदी गाणी तसेच योगेश सुपेकरचे निवेदन, विनोदी किस्से आणि कलाकरांचे आवाज त्याला स्थानिक कलाकारांची साथ मिळणार आहे.....
तसेच
लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांच्या शुभहस्ते श्री तुळशीबाग गणरायाची प्रतिकृती जर्मन येथील नमस्ते लांगेन या मंडळास प्रतिष्ठापनेसाठी देण्यात येणार आहे..त्यावेळी बाप्पाची मिरवणुकी होणार असून रमणबाग पथक वादन करणार आहे...सदर कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार कोषाध्यक्ष नितीन पंडित,
आमदार हेमंतभाऊ रासने यांची कन्या श्रेयाताई रासने ॲड प्रविण करपे जर्मनीत उपस्थित राहणार आहेत....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत