Header Ads

Header ADS

लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करावा – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

Lampī-carmarōgācyā-pārśvabhūmīvara- pōḷā-saṇa-gharagutī-pad'dhatīnēca- sājarā-karāvā-jil'hā-praśāsanācē-āvāhana



लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करावा – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

लेवाजगत न्यूज जळगाव दि. १९ -यंदाचा पोळा सण लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर घरगुती पद्धतीनेच साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून आपापल्या घरीच बैलपूजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

     जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जनावरे एकत्र आल्यास लम्पी रोग पसरण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी पारंपरिक आनंद घरच्या घरीच साध्या व सुरक्षित पद्धतीने साजरा करावा.

“आपल्या सर्वांच्या सहभागातूनच जनावरांचे आरोग्य जपले जाईल. लम्पीचा संसर्ग रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पोळा हा सण घरगुती वातावरणात, सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरा करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.