गणेशोत्सव व ईद पूर्वसंध्येला उरण शहरात पोलिसांचा रूट मार्च
गणेशोत्सव व ईद पूर्वसंध्येला उरण शहरात पोलिसांचा रूट मार्च
उरण :लेवाजगत न्यूज प्रतिनिधी (सुनिल ठाकूर)
गणेशोत्सव व ईद सण पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उरण पोलीस ठाण्याच्या वतीने आज भव्य रूट मार्च काढण्यात आला.
हा रूट मार्च उरण पोलीस ठाण्यातून सुरू होऊन बक्षी कॉम्प्लेक्स, राजपाल नाका, गांधी पुतळा, स्वामी विवेकानंद चौक, NI हायस्कूल, कामठा रोड, पालवी हॉस्पिटल, बालाजी दर्गा, उरण बाजारपेठ मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यात समाप्त झाला.
या रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाण्याचे पोनि (गुन्हे) श्री. काटवाणी, दोन सपोनि/पोउपनि तसेच २२ पोलीस अंमलदारांचा सहभाग होता.
पोलिसांच्या या तयारीमुळे नागरिकांत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला असून, आगामी सण निर्विघ्न व शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत