डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये ४५ दात्यांनी केले रक्तदान
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये ४५ दात्यांनी केले रक्तदान
लेवाजगत न्यूज सावदा : गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये ४५ दात्यांनी केले रक्तदान.
सावदा येथील गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिरामध्ये डॉ. राशी अग्रवाल, डॉ. आर्या नाईक, तसेच लक्ष्मण पाटील (पीआरओ), राज तन्वर, यश वाघ, वृषाली जोगे, आणि हिमानी नवले यांनी रक्तदात्यांची काळजी घेऊन आवश्यक सोयी-सुविधांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
या शिबिरात शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. एकूण ४५ दात्यांनी रक्तदान करून गरजूंना वेळेवर रक्त मिळावे यासाठी आपला मोलाचा वाटा उचलला.
शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य या उपक्रमाच्या यशस्वितेमध्ये महत्वाचे ठरले. रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून रुग्णांचे आरोग्य अबाधित राहावे व समाजहित साध्य व्हावे, हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत