पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस! आता प्रवास केवळ १२ तासांत – नवीन वेग, नवीन सुविधा
पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस! आता प्रवास केवळ १२ तासांत – नवीन वेग, नवीन सुविधा!
लेवाजगत न्यूज पुणे: - पुणेकरांसाठी एक दिलासादायक आणि ऐतिहासिक पाऊल! लवकरच पुणे ते नागपूर (अजनी) दरम्यान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावणार असून रेल्वे बोर्डाकडून या सेवेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
सध्या या मार्गावर सर्वात वेगवान असलेली हावडा-दुरांतो एक्स्प्रेस १२ तास ५५ मिनिटे वेळ घेते. मात्र ‘वंदे भारत’ ही वेळ कमी करून केवळ १२ तासांत पुणे-नागपूर अंतर पार करणार आहे.
🔹 मुख्य वैशिष्ट्ये:
-
भारताची प्रतिष्ठित ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आता पुणेकरांसाठी
-
प्रवासात १ तासांची बचत
-
अत्याधुनिक सुविधा, आरामदायक प्रवास
🕒 अनुमानित वेळापत्रक:
-
पुणे प्रस्थान – सकाळी ६:२०
-
अजनी आगमन – सायंकाळी ६:२०
-
अजनी प्रस्थान – सकाळी ९:२०
-
पुणे आगमन – रात्री ९:३०
🛤️ प्रस्तावित थांबे:
दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा
🛏️ ‘स्लीपर कोच’साठी मागणी वाढली
सुमारे ८९० किलोमीटरचा प्रवास चेयरकारमध्ये करणं त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वंदे भारत स्लीपर कोच’साठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
🗓️ उद्घाटनाची शक्यता:
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात पुणे-नागपूर, बेळगाव-बंगळूर, आणि कटरा-अमृतसर मार्गांवरील वंदे भारत गाड्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्यातील एखाद्या रविवारी भव्य उद्घाटन होण्याची शक्यता.
✨ नवीन युगाची सुरुवात
'वंदे भारत' म्हणजे फक्त एक गाडी नाही, तर भारतीय रेल्वेच्या प्रगतीचे प्रतीक आहे – आता पुणे-नागपूरही या वेगवान युगात सामील!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत