समृद्धी नरेंद्र तायडे हिला आर्चरी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ३० मीटरमध्ये रौप्यपदक; संघाला सुवर्णपदक
समृद्धी नरेंद्र तायडे हिला आर्चरी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ३० मीटरमध्ये रौप्यपदक; संघाला सुवर्णपदक
पुणे (प्रतिनिधी – लेवा जगत न्यूज, सावदा) – लहान वाघोदा, ता. रावेर, जि. जळगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेली समृद्धी नरेंद्र तायडे हिने आर्चरी (धनुर्विद्या) क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करताना शालेय राष्ट्रीय स्पर्धेत (६८ वी नॅशनल स्कूल गेम्स २०२४-२५) ३० मीटर इंडियन राऊंड प्रकारात ३३० गुण मिळवून रौप्यपदक पटकावले, तर तिच्या संघाने सुवर्णपदक पटकावत एकूण चौथी रँक मिळवली.
ही स्पर्धा ११ ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान नडीयाद, गुजरात येथे पार पडली. समृद्धी ही सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल, वडगाव बु॥, पुणे येथे शिक्षण घेत आहे. तिच्या या यशामागे आंतरराष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षक रणजीत चामले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे समृद्धी ही रिटायर्ड कमांडर जीवन तायडे यांची सुकन्या आहे. देशसेवेचा वारसा सांभाळत तिने क्रीडा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
समृद्धीच्या या घवघवीत यशामुळे तिच्या कुटुंबासह गाव, शाळा आणि पुणे-जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत