उद्योजक युवराज प्रेमचंद नेमाडे यांचे निधन
उद्योजक युवराज प्रेमचंद नेमाडे यांचे निधन
सावदा (लेवा जगत न्यूज): सावदा येथील रहिवासी व सध्या शांतीनगर, भुसावळ येथे वास्तव्यास असलेले उद्योजक युवराज प्रेमचंद नेमाडे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार संध्याकाळी ७ वाजता सिद्धिविनायक अपार्टमेंट शांतीनगर महिला कोठेच्या कॉलेज जवळ, भुसावळ येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते सावदा शहराच्या माजी नगराध्यक्ष माधुरी युवराज नेमाडे यांचे पती होत. तसेच धान्याचे व्यापारी किरण प्रेमचंद नेमाडे, जगन्नाथ प्रेमचंद नेमाडे व अशोक प्रेमचंद नेमाडे यांचे ते बंधू होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत