सावदा येथे संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक व प्रतिमापूजन
सावदा येथे संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक व प्रतिमापूजन
लेवा जगत न्यूज सावदा : नामिक समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणी श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सावदा नामिक समाज सेवा प्रतिष्ठानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता गांधी चौकातील विठ्ठल मंदिरापासून संतसेना महाराजांची पालखी मिरवणूक निघेल. ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करून कोचुर रोडवरील नगरपालिकेच्या हॉल येथे समाप्त होईल.
यानंतर सकाळी १० वाजता हॉलमध्ये श्री संतसेना महाराज प्रतिमापूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सतीश महाजन, युवराज सापकर, युवराज इंगळे आयोजकांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत