Header Ads

Header ADS

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त सावदा येथे ज्युनिअर फोटोग्राफर संघाचा कार्यक्रम

 

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त सावदा येथे ज्युनिअर फोटोग्राफर संघाचा कार्यक्रम

लेवाजगत न्युज सावदा :

आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त सावदा येथे ज्युनिअर फोटोग्राफर संघ यांच्यामार्फत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रावेर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील अनेक फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.


कार्यक्रमाची सुरुवात कॅमेरा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. फोटोग्राफर बांधवांना नवनवीन तंत्रज्ञान शिकता यावे या हेतूने या दिवशी लाईट रूम कलर ग्रेडिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते.


या वर्कशॉपसाठी पुणे येथील सुप्रसिद्ध मार्गदर्शक दीक्षांत चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी फोटोग्राफीमध्ये अपडेट राहण्यासाठी विविध पर्यायांची माहिती दिली तसेच फोटो एडिटिंग व कलर ग्रेडिंग संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले.


संपूर्ण कार्यक्रमात फोटोग्राफर बांधवांचा उत्साह व एकता दिसून आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पटेल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन तायडे यांनी केले.


फोटोमध्ये उपस्थित – गोकुळ महाजन, अभय निमकाने, चेतन तायडे, चेतन महाजन, अमोल महाजन, संजय लोखंडे, अवी कोळी, अमोल कोळी, हरी शेळके, विकी मोरे आदी फोटोग्राफर बांधव तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक दीक्षांत चौधरी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.