बोदवड (नाडगाव) रेल्वे स्टेशनवर सुरत-अमरावती एक्सप्रेसला थांबा मिळाला..!
बोदवड (नाडगाव) रेल्वे स्टेशनवर सुरत-अमरावती एक्सप्रेसला थांबा मिळाला..!
लेवाजगत न्युज, बोदवड :-
आज बोदवड (नाडगाव) रेल्वे स्टेशनवर सुरत-अमरावती एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी तसेच विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. हिरवा झेंडा दाखवत गाडीला थांबा देण्यात आला.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेना, रेल्वे प्रवासी संघटना, कर्मचारी वर्ग व स्थानिक जनतेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ही मागणी मान्य झाली आहे.
या कार्यक्रमावेळी रेल्वे स्टेशनवर असलेल्या गैरसोयी, तक्रारी व समस्या प्रवाशांकडून जाणून घेण्यात आल्या व त्याबाबत संबंधित अधिकारी व रेल्वे प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.
हा निर्णय बोदवड व परिसरातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून सोयी-सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.
%20%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत