अपघातग्रस्ताला आमदार अमोलभाऊ जावळे यांची तातडीची मदत
अपघातग्रस्ताला आमदार अमोलभाऊ जावळे यांची तातडीची मदत
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | फैजपूर
फैजपूर-हंबर्डी मार्गावरील चोरवड येथे आज सकाळी प्रमोद लहानू रजाने यांचा दुर्दैवी अपघात झाला. अपघातानंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाच योगायोगाने या मार्गे प्रवास करीत असलेले रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांची नजर या अपघाताकडे गेली.
अपघातग्रस्ताची अवस्था पाहताच आमदार जावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने आपली गाडी थांबवली. स्वतः पुढाकार घेत त्यांनी प्रमोद रजाने यांना गाडीत बसवून थेट फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाला त्वरित व योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधून आवश्यक ती सर्व चौकशी केली.
अचानक घडलेल्या या प्रसंगात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही केवळ मदत नसून खरी माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली. “संकटाच्या क्षणी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजेच खरा जनसेवक” अशी भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत