खोटे इंस्टाग्राम अकाउंट तयार करून महिलांची बदनामी करणाऱ्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
खोटे इंस्टाग्राम अकाउंट तयार करून महिलांची बदनामी करणाऱ्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) : खोटे इंस्टाग्राम अकाउंट तयार करून गावातील महिलांची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व इतर महिला साक्षीदारांचे खोटे इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर त्यांच्या छायाचित्रांसोबत चिनावल गावातील पुरुषांचे फोटो टाकण्यात आले. तसेच कमेंट्समध्ये अश्लील व अवमानकारक शिवीगाळ लिहून संबंधित महिलांचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.
या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये CCTNS गु. र. नं. 227/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75(3), 296 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67, 67 (अ) प्रमाणे आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत