Contact Banner

उटखेडा शिवारातील शेती पंपांसाठी विवरे फिडरवरून वीजपुरवठा सुरू करावा – धनंजय शिरीष चौधरी यांची मागणी

 

Demand of Dhananjay Shirish Chaudhary to start power supply from borehole feeder for agricultural pumps in Utkheda suburbs


उटखेडा शिवारातील शेती पंपांसाठी विवरे फिडरवरून वीजपुरवठा सुरू करावा – धनंजय शिरीष चौधरी यांची मागणी


लेवाजगत न्यूज रावेर (ता. रावेर), दि. ९ सप्टेंबर :उटखेडा शेत शिवारातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मा. धनंजय शिरीष चौधरी यांनी म.रा.वि.कें. सावदा येथील कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन उटखेडा शेत शिवारातील शेती पंपांसाठी वीजपुरवठा विवरे फिडरवरून सुरू करण्याची मागणी केली आहे.


निवेदनात श्री. चौधरी यांनी म्हटले आहे की,

"उटखेडा शेत शिवारातील शेती पंपांसाठी विवरे फिडरवरून वीजपुरवठा करण्यात आल्यास शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध होईल आणि त्याचा थेट फायदा शेती पिकांना मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल."


तसेच, या संदर्भात शेतकरी प्रतिनिधी व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.