Contact Banner

बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून महिलांचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

 

Accused of molesting women by creating fake Instagram ID arrested

बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून महिलांचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत 

लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) : सावदा पोलीस स्टेशन हद्दीत महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हा रजी. क्र. 227/2025 असा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75(3), 296 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67, 67(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी  सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  आशिष अडसुळ (मुक्ताईनगर पोलीस स्टेशन), सपोनि विशाल पाटील (सावदा पोलीस स्टेशन) व तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी शुद्धोधन मोहन सिरसाठ (वय 26 वर्षे, रा. न्यू भीमनगर, शिवणी, ता. जि. अकोला) यास अटक केली. आरोपीने फिर्यादीच्या नावाने खोटे इंस्टाग्राम खाते तयार करून महिलांची बदनामी केली होती.

सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक 13 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.