Contact Banner

पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला : व्हाईस ऑफ मीडिया व ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे हल्लेखोरांचा निषेध

 

Attacks on journalists are attacks on democracy. Voice of Media and Tapti Satpuda Journalist Foundation condemn the attackers.


पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला : व्हाईस ऑफ मीडिया व ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे हल्लेखोरांचा निषेध

हल्लेखोरांना अटक व पत्रकार सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

लेवाजगत न्यूज सावदा :-त्र्यंबकेश्वर येथे झी २४ तासचे ब्युरो प्रमुख योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजीत सोनवणे व पुढारी न्यूजचे किरण ताजणे या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडिया तसेच ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

फैजपूर येथील विभागीय प्रांत कार्यालयास तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना निवेदन देऊन पत्रकारांवरील हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी व पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

पत्रकार हे समाजाचे प्रहरी असून त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. अन्यथा पत्रकार समाज व जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रसंगी -  प्रसंगी ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष,vom डिजिटल मीडिया विंग जळगांव जिल्हाध्यक्ष -शामकांत पाटील, उपाध्यक्ष - प्रवीण पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया चे विभागीय प्रमुख -मिलिंद टोके, vom जिल्हाध्यक्ष - पंकज पाटील, vom रावेर तालुका अध्यक्ष - अनोमदर्शी तायडे सर, राजेंद्र दिपके, भारत हिवरे, साजिद शेख, राजेंद्र भारंबे, प्रदीप  कुलकर्णी, पिंटू कुलकर्णी, राज चौधरी,राजेश पाटील, अज्जू शेख,गणेश भोई,करण तायडे, मिलिंद कोरे,रवींद्र हिवरकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.