दहिगाव शिवारातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; यावल पोलिसांचा तपास सुरू
दहिगाव शिवारातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; यावल पोलिसांचा तपास सुरू
लेवाजगत न्यूज यावल-यावल तालुक्यातील दहिगाव शिवार हादरून गेले आहे. चुंचाळे रस्त्यावरील खुशाल चौधरी यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृताचे नाव महमूद हुसेन पटेल (वय ४०, रा. दहिगाव) असे आहे. मृतदेह आढळताच यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक धारवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, राजेंद्र पवार, विजय चौधरी आणि पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.
या मृत्यूमागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरी माहिती समोर येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत