खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तुळशीच्या रोपांचा वाटप....
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तुळशीच्या रोपांचा वाटप....
लेवाजगत न्यूज उरण: सुनिल ठाकूर
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणरायाच्या दर्शनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली त्यावेळेस त्यांच्या हस्ते उपस्थित गणेश भक्तांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार उपाध्यक्ष विनायक कदम कोषाध्यक्ष नितीन पंडित उपस्थित होते..
मंडळाने यावर्षी मथुरे येथील वृंदावन ची सजावट केली आहे तसेच तुळशीबाग राम मंदिर येथे तुळशीची बाग प्रसिद्ध होती त्याला अनुसरून ११२५ तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
मा. सुप्रिया सुळे यांनी गणराया चरणी प्रार्थना केली माझा बळीराजा सुखी राहू दे त्याचप्रमाणे मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत