रावेर ते खेतिया थेट एस.टी. बससेवेची मागणी – प्रवाशांचे हाल संपविण्याची गरज
रावेर ते खेतिया थेट एस.टी. बससेवेची मागणी – प्रवाशांचे हाल संपविण्याची गरज
लेवाजगत न्यूज रावेर-रावेर तालुका हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेलगत असलेला तालुका असून, तालुक्यातील अनेक गावांचा मध्यप्रदेशातील खेतिया या शहराशी दैनंदिन संपर्क असतो. व्यापार, शिक्षण, वैद्यकीय सेवा व इतर आवश्यक कारणांस्तव दररोज शेकडो नागरिक रावेर ते खेतिया या मार्गावर प्रवास करत असतात.
मात्र, सध्या रावेरहून खेतिया येथे थेट एस.टी. बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना चोपडा, शिरपूर, शाहादा या मार्गे अनेक बसेस बदलत प्रवास करावा लागतो. परिणामी वेळ, पैसा आणि श्रम यांची नासाडी होत असून, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे.
ही समस्या लक्षात घेता युवा सेना रावेर शहरप्रमुख श्री. निलेश दलपत महाजन यांनी वरिष्ठ लिपिक, रा.प. रावेर यांच्या माध्यमातून जळगाव एस.टी. विभाग नियंत्रक यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात रावेर – खेतिया थेट बससेवा लवकरात लवकर सुरु करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“या मार्गावर बससेवा सुरु झाल्यास दोन्ही राज्यांतील सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी,” असे आवाहन श्री. महाजन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत