धनाजी नाना महाविद्यालयात रावेर-यावल परिसरातील लेखिका-लेखकांच्या ग्रंथसाहित्याचे प्रदर्शन
धनाजी नाना महाविद्यालयात रावेर-यावल परिसरातील लेखिका-लेखकांच्या ग्रंथसाहित्याचे प्रदर्शन
लेवाजगत न्यूज फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयातील ग्रंथालय व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने "रावेर-यावल परिसरातील लेखिका-लेखकांच्या ग्रंथ साहित्याचे प्रदर्शन" १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सेमिनार हॉलसमोर उत्साहात आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. सिंधू भंगाळे यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. कार्यक्रमानंतर प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी आपल्या लहानपणीच्या वाचनाच्या आठवणींना उजाळा देत वाचन व लेखनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आय. जी. गायकवाड यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. झेड. सुरवाडे, प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे, प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा. विजय तायडे, प्रा. डॉ. विजय सोनजे आणि प्रा. उन्नती चौधरी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. उमाकांत पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. या उपक्रमाला यश मिळवून देण्यासाठी श्री. सहर्ष चौधरी, सौ. सुरेखा सोनवणे आणि कु. यामिनी पाटील यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गानेही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत