Contact Banner

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १५ सप्टेंबर रोजी आयोजन


District-level-Women-Democracy-Day-15-September-Rosy-Organization


जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १५ सप्टेंबर रोजी आयोजन 

लेवाजगत न्यूज जळगाव :-जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली.

या उपक्रमामागील उद्देश म्हणजे समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत तक्रारी व अडचणींची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे ही या दिनाची प्रमुख संकल्पना आहे.

महिला लोकशाही दिन हा उपक्रम जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसारच १५ सप्टेंबर रोजी हा दिन पाळला जाणार आहे.

सर्व गरजू महिलांनी वेळेवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.