Contact Banner

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे ज्येष्ठ बंधू डॉ. बारसु खडसे यांचे निधन

Former Revenue Minister Eknathrao Khadse's elder brother Dr. Barsu Khadse passes away


माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचे ज्येष्ठ बंधू डॉ. बारसु खडसे यांचे निधन


लेवाजगत


लेवा जगत न्यूज – जळगाव / दापोली :
महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य मा. आ. एकनाथराव खडसे यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. बारसु गणपतराव खडसे (वय 85, रा. कोथळी) यांचे 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव दापोली येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करण्यात येणार आहे. ते मुंबई व परिसर लेवा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच परळ, मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटचे माजी संचालक होते. एक समर्पित शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी समाजजीवनात वेगळी छाप पाडली असून त्यांच्या कार्याचा लाभ अनेकांना झाला आहे.

डॉ. खडसे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे झाले तर उच्च शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी मिळवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.