अमृत जल योजनेतील नित्कृष्ट काम व निष्काळजी कारभाराविरोधात सावदा येथिल पत्रकारांचे उपोषण करण्याचा इशारा
अमृत जल योजनेतील नित्कृष्ट काम व निष्काळजी कारभाराविरोधात सावदा येथिल पत्रकारांचे उपोषण करण्याचा इशारा
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :
सावदा शहरातील अमृत जल योजना ही नागरिकांसाठी महत्त्वाची ठरावी अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या योजनेत नित्कृष्ट व अपूर्ण दर्जाचे काम झाल्याने नागरिकांना सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, योजनेतील निकृष्ट काम उघडकीस आल्यानंतरही संबंधित ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली आहे. ही बाब नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारी असून प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
या योजनेत वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असून पाईपलाईन वारंवार निकामी होत आहेत. अनेक भागातील कामे अपूर्ण, विस्कळीत व तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण अवस्थेत आहेत. शिवाय नागरिकांना शुद्ध पाण्याऐवजी अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे आरोप होत आहेत. तक्रारी करूनही अधिकारी व ठेकेदारांचा नागरिकांप्रती उपेक्षित व गर्विष्ठ दृष्टिकोन कायम असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन तर्फे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दि. 29 सप्टेंबर 2025 पासून पत्रकार बांधव सावदा नगरपरिषदेसमोर लोकशाही मार्गाने उपोषणास बसतील, असा इशारा देण्यात आला आहे. या उपोषणामुळे उद्भवणाऱ्या परिणामास प्रशासनच जबाबदार राहील, असे फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष,व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग जळगांव जिल्हाध्यक्ष -शामकांत पाटील, उपाध्यक्ष - प्रवीण पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया चे विभागीय प्रमुख -मिलिंद टोके, vom जिल्हाध्यक्ष - पंकज पाटील, vom रावेर तालुका अध्यक्ष - अनोमदर्शी तायडे सर, राजेंद्र दिपके, भारत हिवरे, साजिद शेख, राजेंद्र भारंबे, प्रदीप कुलकर्णी, पिंटू कुलकर्णी, राज चौधरी,राजेश पाटील, अज्जू शेख,गणेश भोई,करण तायडे, मिलिंद कोरे,रवींद्र हिवरकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत