Contact Banner

सावदा तालुका रावेर ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Free health check-up camp at Savda-Taluka-Raver-Rural-Hospital


सावदा तालुका रावेर ग्रामीण रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :सावदा तालुका रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात  स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांना प्रचंड प्रतिसाद अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणीसह इतर सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक तपासण्या नागरिकांसाठी मोफत करण्यात येणार आहेत.

शिबिराचे आयोजन बुधवार, दिनांक १ रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार असून दुपारी २ वाजेपर्यंत तपासणी सुरू राहील. या शिबिरामध्ये गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच उपचार संदर्भातील माहिती मिळणार आहे.

सेवा पंधरवाड्यात होत असलेल्या या दुसऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.