Contact Banner

लॉरेन्स बिश्नोई टोळी दहशतवादी म्हणून घोषित


 लॉरेन्स बिश्नोई टोळी दहशतवादी म्हणून घोषित

लेवाजगत न्युज, मुंबई :

कॅनडा सरकारने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीला अधिकृतपणे “दहशतवादी संघटना” घोषित केले आहे.
 पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात या टोळीचा थेट सहभाग असल्याचे मानले जाते.

 यामुळे आता कॅनडात या टोळीशी संबंधित मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवणे तसेच या टोळीला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे शक्य झाले आहे.

या टोळीवर खंडणी, खून, आगी लावणे, हत्यारांची तस्करी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती सेंट्रल जेलमध्ये असून, तुरुंगातूनच तो आपल्या टोळीचे कामकाज चालवतो असा गंभीर आरोप आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे भारत–कॅनडा संबंधांमध्ये तणाव अधिक वाढला आहे. मात्र भारताने हे आरोप राजकीय हेतूपुरते असल्याचे स्पष्ट करत फेटाळले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.