Contact Banner

इंडिया–पाकिस्तान सामन्यावर ऑनलाईन सट्टा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

India-Pakistan-face-off-online-speculation-Jalgaon-local-crime-branch-action


इंडिया–पाकिस्तान सामन्यावर ऑनलाईन सट्टा; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई






भुसावळ प्रतिनिधी फिरोज खान –
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथे धाड टाकून इंडिया वि. पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळविणाऱ्या दोन इसमांना अटक करून १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी पो. उपनिरीक्षक शरद बागल यांना गोपनीय माहिती मिळाली की, प्रकाश हुंदामल सारडा (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) हा आपल्या घरी ऑनलाईन सट्टा खेळवत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, भुसावळ)रणजीत चत्रभान हंडी (वय ३५, गणपतीनगर, जळगाव) हे दोघे सट्टा खेळविताना रंगेहात पकडले गेले.

त्यांच्याकडून ऑनलाईन बेटिंगसाठी वापरलेले साहित्य व एकूण ₹१,०५,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४५८/२०२५ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो. उपनिरीक्षक शरद बागल,पो . उपनिरीक्षक रवि नरवाडे, पोहेक. उमाकांत पाटील, पोना. विकास सातदिवे, पोकों. राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोको. दर्शना पाटील, चा. पोहे. भरत पाटील आदींचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.