Contact Banner

विवाहितेने सहा वर्षीय मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या

 

Married woman commits suicide with six-year-old daughter under train


विवाहितेने सहा वर्षीय मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या

धान्य घ्यायला जाते असे सांगून घरून निघाल्यानंतर दुर्दैवी घटना

लेवाजगत न्यूज नशिराबाद प्रतिनिधी –नशिराबाद येथील एका ३० वर्षीय विवाहितेने सहा वर्षीय मुलीसह रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपविले. सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता भादली रेल्वे स्थानकाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली.

मृतांची नावे मनीषा सुरेश कावडे (वय ३०)गौरी सुरेश कावडे (वय ६) अशी आहेत. मनीषा कावडे या पती सुरेश, मोठी मुलगी वीरा (वय ११) व लहान मुलगी गौरीसोबत भवानीनगर, नशिराबाद येथे राहत होती. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास त्या “धान्य घेऊन येते” असे सांगून लहान मुलगी गौरीला घेऊन घराबाहेर पडल्या. काही वेळातच त्यांनी भादली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इंजिनसमोर उडी घेत आत्महत्या केली.

सुरतच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेच्या इंजिनसमोर मनीषा यांनी मुलीसह उडी घेतल्याचे रेल्वे चालकाने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मंगळवारी दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. पंचनामा पोलिस कॉन्स्टेबल रूपेश साळवे यांनी केला. मनीषाचे माहेर चंद्रपूर येथे असून, सहा वर्षीय गौरी ही नशिराबादच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होती.

आठ दिवसांत दुसरी घटना
भादली रेल्वे स्थानक परिसरात गेल्या आठ दिवसांत आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी नशिराबाद नगरपालिकेतील शिपाई सागर लोखंडे (वय ४०) यांनी देखील रेल्वे इंजिनखाली झोपून आत्महत्या केली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.