Contact Banner

"मन की बात" मध्ये पंतप्रधानांनी दिला व्होकल फॉर लोकलचा मंत्र; सावदा येथे संकल्प पत्र भरण्याची मोहीम

In Mann Ki Baat, the Prime Minister gave a vocal for local mantra, a campaign to fill out a resolution letter at Savda.


"मन की बात" मध्ये पंतप्रधानांनी दिला व्होकल फॉर लोकलचा मंत्र; सावदा येथे संकल्प पत्र भरण्याची मोहीम

सावदा (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या १२६व्या मन की बात कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी प्रथम शहिद भगतसिंग आणि “गान कोकिळा” लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच जीएसटी महोत्सवाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, कमी झालेल्या जीएसटीमुळे नागरिकांना फायदा होईल.

पंतप्रधानांनी सर्वांना व्होकल फॉर लोकल चा मंत्र अमलात आणून स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रोत्साहित केले आणि येत्या २ ऑक्टोबर, गांधी जयंतीनिमित्त, किमान एक खादीचे वस्त्र खरेदी करून वापरण्याचे आवाहन केले. तसेच छट पूजा आणि दुर्गा पूजा आता आंतरराष्ट्रीय महोत्सव बनले आहेत व ते संपूर्ण जगात साजरे होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी येणाऱ्या सर्व सण व महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छाही दिल्या.

सावदा येथे हा मन की बात कार्यक्रम संतोष परदेशी यांचे दुर्गा केबल कार्यालय मध्ये सावदा भाजपा मंडळाच्या तर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, बेटी बचावच्या जिल्हासंयोजिका सारिका चव्हाण, सावदा मंडळ सरचिटणीस महेश अकोले, उपाध्यक्ष संतोष परदेशी, माजी उपनगराध्यक्ष सौ. नंदाबाई लोखंडे, सावदा मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष सचिन बहाटे, कोषाध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रसिद्ध प्रमुख दिपक श्रावगे, प्रतीक भारंबे, राकेश पाटील, महंत निलगिरी कंप्युटर संचालिका वर्षा परदेशी, दुर्गा केबल संचालक किशोर परदेशी यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर भाजपा तर्फे नागरिकांमध्ये स्वदेशी संकल्प पत्र भरण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या संकल्प पत्राद्वारे नागरिकांनी दैनंदिन जीवनात स्वदेशी वस्तू वापरण्याची प्रतिज्ञा घेतली व उपस्थितांनी उत्साहाने संकल्प पत्र भरणे सुरू केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.