Contact Banner

साप्ताहिक ‘लेवा जगत’चा गौरवशाली 18 वा वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित

Weekly-'Leva-Jagat'-glorious-18th-anniversary-special-issue-published

Weekly-'Leva-Jagat'-glorious-18th-anniversary-special-issue-published


साप्ताहिक ‘लेवा जगत’चा गौरवशाली 18 वा वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित 

लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी :
लेवा समाजासह इतर सर्व समाजाच्या भावना, प्रश्न आणि घडामोडींना न्याय देत मागील दीड दशकाहून अधिक काळ सतत प्रकाशमान राहिलेलं साप्ताहिक लेवा जगत या वृत्तपत्राने आपल्या वाटचालीतील १८ वर्षांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने खास वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित करण्यात आला.

या विशेषांकाचे विमोचन आज दिनांक २८ सप्टेंबर, रविवार रोजी सकाळी १० वाजता सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात संतांच्या शुभहस्ते होणार आहे.

संपादक मंडळाने या प्रसंगी सांगितले की,
“आमच्या प्रवासात जाहिरातदार व वर्गणीदार यांचे मोलाचे सहकार्य नेहमीच लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आज आम्ही १८ वर्षांची वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो. लेवा समाजासह इतर समाज बांधवांनी दाखवलेला विश्वासच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”

यापुढेही जाहिरातदार व वर्गणीदार यांनी असाच अधिकाधिक पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच ज्यांना आमच्या लेवा जगत वृत्तपत्रात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाहिरात द्यायची आहे, त्यांनी संपादक मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

यासोबतच लेवा जगतच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या सोशल मीडिया साईट, युट्युब चॅनेल, वेबसाईट, इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि इतर माध्यमांतून आम्ही आपले प्रश्न, लेख तसेच आपल्या भागातील संपूर्ण बातम्या दररोज प्रसिद्ध करीत असतोच, अशी माहितीही देण्यात आली.

संपर्कासाठी :
📧 ई-मेल – lewajagat@gmail.com
📞 मोबाईल – 86684 14507

सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि पत्रकारितेच्या प्रामाणिक परंपरेला वाहिलेली ही अखंड धडपड येणाऱ्या काळात अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प  व्यक्त करण्यात आला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.