यावल येथील २२ वर्षीय दुचाकीस्वार साकळी जवळील भारत तोलकाट्यासमोरिल भीषण अपघात ठार
साकळी जवळील भारत तोलकाट्यासमोर भीषण अपघात-यावल येथील २२ वर्षीय दुचाकीस्वार ठार
लेवाजगत न्यूज यावल : तालुक्यातील साकळी गावाजवळील भारत तोलकाट्याच्या समोर सोमवार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दुचाकी आणि क्रुझर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २२ वर्षीय मोहित रवींद्र कुवर (रा. धनगरवाडा, यावल) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कुवर हे जळगाव येथील कंपनीतून काम आटोपून दुचाकी (क्रमांक एम. एच. १९ एक्स. १७४४) वरून घरी परतत होते. दरम्यान, यावलकडून क्रुझर चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच. १९ बी. यू. २१२९) घेऊन प्रविण सुनिल पाटील (रा. किनगाव) हे चोपड्याकडे जात होते. भारत तोलकाट्याजवळील वळणावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वार मोहित कुवर गंभीर जखमी झाले व घटनास्थळीच ठार झाले.
अपघातानंतर क्रुझर चालक प्रविण पाटील यांनी तातडीने जखमी कुवर यांना स्वतःच्या वाहनातून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ रूपेश कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रुझर चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत