Header Ads

Header ADS

बाजारात धमाकेदार एन्ट्री! हल्दीराम्स-आयटीसीसोबत शिवाश्रित फूड्सची झेप

 बाजारात धमाकेदार एन्ट्री! हल्दीराम्स-आयटीसीसोबत शिवाश्रित फूड्सची झेप

बाजारात धमाकेदार एन्ट्री! हल्दीराम्स-आयटीसीसोबत शिवाश्रित फूड्सची झेप



लेवाजगत न्यूज उरण: सुनिल ठाकूर - अलिगढस्थित बटाटा प्लेक्स उत्पादक शिवाश्रित फूड्स आज एनएसई इमर्जवर सूचीबद्ध होत असून आपल्या प्राथमिक समभाग विक्रीतून (IPO) ₹70.03 कोटी उभारले आहेत. कंपनी आता विस्ताराच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असून वाढत्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या मागणीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्ताराचे नियोजन करत आहे.


या आयपीओमध्ये ₹61.29 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹8.75 कोटींचा ऑफर फॉर सेल समाविष्ट होता. उभारलेल्या रकमेचा वापर क्षमता विस्तार, कार्यकारी भांडवल आणि सामान्स कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी होणार आहे. यापैकी सुमारे ₹26.3 कोटी नव्या उत्पादन लाईन्स, स्वतंत्र बटाटा प्लेक्स युनिट आणि सोलार पॉवर जनरेटरसह युटिलिटी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सुमारे ₹19 कोटी कार्यकारी भांडवलासाठी वापरले जातील, तर उर्वरित रक्कम सामान्स कॉर्पोरेट गरजा आणि इश्यू खर्चासाठी वापरली जाईल.


भक्कम आर्थिक कामगिरीच्या जोरावर, शिवाश्रितने FY25 मध्ये ₹105.85 कोटींचे उत्पन्न नोंदवले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 36% वाढ दर्शवते. निव्वळ नफा ₹12.06 कोटींपर्यंत सुधारला असून यामागे मागणीतील वाढ आणि कार्यक्षमतेचा हातभार आहे. कंपनीकडे नामवंत सॅक उत्पादक बी2बी ग्राहक आहेत आणि नुकतेच श्री आहार या ब्रँडद्वारे रिटेल सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.


उद्योगाचे परिदृश्यही अनुकूल आहे. शहरीकरण, रेडी-टू-ईट उत्पादनांची मागणी आणि वाढत्मा निर्यातीमुळे भारतातील फूड प्रोसेसिंग क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. स्पॅक्स, रेडी-टू-ईट जेवण आणि बेकरी उत्पादनांसाठी महत्त्वपूर्ण घटक असलेल्या बटाटा प्लेक्सचा वापर झपाट्याने वाढतो आहे. अलिगढमधील प्रगत सुविधा, बटाटा उत्पादन करणाऱ्या पट्ट्‌याजवळील भौगोलिक जवळीक आणि ISO 22000, FSSAI, HALAL, BRCGS व USFDA यांसारख्या प्रमाणपत्रांमुळे शिवाश्रित या वाढत्या मागणीचा लाभ घेण्यास सज्ज आहे.


"हल्दीराम्स, आयटीसी आणि बालाजी वेफर्ससारख्या नामांकित फूड जायंट्ससोबतची आमची भागीदारी शिवाश्रितच्या गुणवत्तेवरील आणि सातत्यावरील विश्वास अधोरेखित करते. आयपीओमुळे आम्हाला क्षमता वाढवण्यासाठी, उत्पादन पोर्टफोलिओ विविध करण्यासाठी आणि भारताच्या फूड प्रोसेसिंग इकोसिस्ट्ममध्ये विश्वासार्ह भागीदार म्हणून आपली भूमिका अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक संसाधने मिळतील," असे निशांत सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, शिवाश्रित फूड्स यांनी सांगितले.


एसएमई विभागावर लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांच्या मते, मागणीचे स्पष्ट भान, उच्च क्षमता वापर आणि सुयोग्य विस्तार धोरण यामुळे सूचीबद्धीनंतर कंपनीच्या कामगिरीला चालना मिळू शकते. गुंतवणूकदारांसाठी ही नोंदणी वाढत्या मागणीसह मर्यादित संघटित खेळाडू असलेल्या विशेष श्रेणीत गुंतवणुकीची संधी आहे.


स्पष्ट विस्तार धोरण आणि स्थिर मागणी घटकांच्या आधारावर, शिवाश्रित फूड्स भारताच्या फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील दीर्घकालीन वाढीची कहाणी म्हणून स्मृतःला सादर करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.