आमोदे येथील नवयुवक गणेश मंडळ तर्फे मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर
आमोदे येथील नवयुवक गणेश मंडळ तर्फे मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर
लेवाजगत न्यूज आमोदे (ता. यावल) – आमोदे गावातील नवयुवक गणेश मंडळाच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आरोग्य तपासण्या करून घेतल्या.
शिबिरात डॉ. साकीब फारुकी (वैद्यकीय अधिकारी, हिंगोणा) व डॉ. अतुल वायकोळे (समुदाय आरोग्य अधिकारी, आमोदे) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी रक्तदाब तपासणी (B.P) करण्यात आली तसेच क्षयरोग, डेंग्यू आणि मलेरिया या आजारांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे, क्षय रोग व तंबाखूविरोधी जनजागृती हा शिबिराचा मुख्य भाग ठरला. “तंबाखू सोडा – आरोग्य जोडा”, “तंबाखूमुक्त समाज – सुदृढ भारताची ओळख” अशा घोषवाक्यांद्वारे नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
“आपले आरोग्य – आपली जबाबदारी” हा संदेश देत शिबिराचा समारोप करण्यात आला. या उपक्रमासाठी डॉ. अतुल वायकोळे यांच्यासह आरोग्य उपकेंद्र आमोदेतील आशा सेविका, माजी सैनिक सुरेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते चेतन चौधरी, तेजस पाटील, हितेश चौधरी, सागर पाटील, योगेश चौधरी, कुणाल पाटील तसेच नवयुवक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत