“स्वप्रतिमा जपणे महत्त्वाचे”-प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव
“स्वप्रतिमा जपणे महत्त्वाचे”-प्रा. डॉ.एस.व्ही. जाधव
लेवाजगत न्यूज फैजपूर – आजची तरुणाई व आत्मभान या विषयावर हिंदी विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. एस. व्ही. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तरुणाईसमोरील विविध प्रश्न व आव्हाने स्पष्ट केली.
डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व स्वतःची ठोस संकल्पना असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. जोडीदार निवड करताना विविध पैलूंचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे, तसेच तरुणाईत घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो, याविषयी त्यांनी उदाहरणांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलताना डॉ. जाधव म्हणाले की, “स्वप्रतिमा जपणे आणि चारित्र्य निर्मिती साधणे हेच खरी प्रगतीचे लक्षण आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. कल्पना पाटील यांनी भूषविले. आपल्या भाषणात त्यांनी स्वतःच्या विकासात स्वतःचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा बारी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारुती जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत