Contact Banner

बातमी : शिर्डीत गृहमंत्री अमित शाह साईंचरणी नतमस्तक


 बातमी : शिर्डीत गृहमंत्री अमित शाह साईंचरणी नतमस्तक 

लेवाजगत न्युज शिर्डी (प्रतिनिधी) :
देशाचे गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी येथे आगमन झाले. त्यांनी सकाळी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले व साईंचरणी नतमस्तक होत पूजा-अर्चा केली. त्यांच्या भेटीमुळे संपूर्ण शिर्डी शहरात कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या प्रसंगी मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली असून, सीसीटीव्ही आणि विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
अमित शाह यांच्या या भेटीमुळे शिर्डीत भक्तांची गर्दी वाढली असून, वातावरण भक्तिमय झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.