Contact Banner

खिरोदा येथील ज्येष्ठ नागरिक हरी चोलू टोके यांचे निधन

Death of senior citizen Hari Cholu Toke of Khiroda


खिरोदा येथील ज्येष्ठ नागरिक हरी चोलू टोके यांचे निधन

लेवा जगत न्यूज प्रतिनिधी – खिरोदा :
खिरोदा गावातील ज्येष्ठ नागरिक  हरी चोलू टोके (वय 87 वर्षे) यांचे आज शुक्रवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच टोके कुटुंबीयांसह नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली.

 हरी चोलू टोके हे साधे, शांत व मनमिळाऊ स्वभावाचे गृहस्थ म्हणून परिचित होते. समाजकार्याबद्दल नेहमी तत्पर राहणाऱ्या त्यांच्या जाण्याने गावाच्या सामाजिक जीवनात पोकळी निर्माण झाली असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, 2 मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते गजेंद्र हरि टोके यांचे वडील तसेच चंदन व वैभव टोके यांचे आजोबा होत. कुटुंबातील सर्वच सदस्य सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून गावातील मान्यवर कुटुंबांपैकी एक म्हणून त्यांचा परिचय आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार, दुपारी 1 वाजता राहत्या घरून (खिरोदा) निघणार असून गावातील मान्यवर, नातेवाईक व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

🙏 लेवा जगत परिवार दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.