सावदा ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिर – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावदा ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिर – नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :सावदा तालुका रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरात तब्बल सुमारे 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी व मार्गदर्शनासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यात डॉ. सुरेश पाटील (बालरोग तज्ञ), डॉ. सुशांत पाटील (अस्थिरोग तज्ञ), शेख अफरोज (नेत्ररोग तज्ञ), डॉ. दौलत निमसे (चिकित्सक मानसतज्ञ), डॉ. बिलाल अन्सारी (सर्जन), डॉ. मयूर जैन (दंत शल्यविशारद), डॉ. नितिन विसपुते (कान, नाक व घसा तज्ञ) यांचा समावेश होता.
तसेच सावदा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये डॉ. प्रविण काकडे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. सचिन पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. निकिता भीरुळ (एमबीबीएस) यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अधिपरिचारिका श्रीमती निलिमा धांडे, चंद्रकला कोल्हे, तृप्ती बढे, हेमलता कोल्हे, हेमलता भंगाळे तसेच आरोग्य कर्मचारी विजय पाटील, दिगंबर परदेशी, दीपक कोष्टी, मंगेश गुरुबे आणि आकाश कोळी यांनी परिश्रम घेतले.
मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत