प्रारूप मतदार यादी जाहीर सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025
सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी
प्रारूप मतदार यादी जाहीर
लेवाजगत न्यूज सावदा:- सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात महत्त्वाची घडामोड झाली आहे. निवडणूक प्रक्रियेचा एक भाग म्हणून नगरपरिषदेच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नागरिकांना त्यांच्या नावे, क्रमांक आणि प्रभागनिहाय मतदार यादीतील तपशील पडताळण्यासाठी नगरपरिषदेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी आपल्या नोंदी योग्य आहेत का हे तपासून, आवश्यक असल्यास दुरुस्तीच्या सूचना निश्चित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संबंधित नागरिकांना खाली दिलेल्या लिंकवरून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या पाहता येतील:
सावदा नगरपरिषद अधिकृत संकेतस्थळ – मतदार यादी पाहा
https://drive.google.com/drive/folders/1xV4WMeWVmMIfBEf32CUG7CRgo3L-16i8?usp=drive_link


कोणत्याही टिप्पण्या नाहीत