Contact Banner

सावदा नगरपरिषदेत प्रभागनिहाय आरक्षण सोडत पारदर्शक वातावरणात पार-महिलांसाठी वाढला सहभागाचा मार्ग

 

By removing ward-wise reservation in the Savda Municipal Council, the path for increased participation for women has been paved in a transparent environment.


सावदा नगरपरिषदेत प्रभागनिहाय आरक्षण सोडत पारदर्शक वातावरणात पार-महिलांसाठी वाढला सहभागाचा मार्ग


लेवा जगत न्यूज – सावदा :

सावदा नगरपरिषदच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी नगरपरिषद सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत उत्साही वातावरणात पार पडली.

By removing ward-wise reservation in the Savda Municipal Council, the path for increased participation for women has been paved in a transparent environment.


या सोडतीच्या वेळी उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच मुख्य अधिकारी भूषण वर्मा यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया पार पडली. या वेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख प्रमोद चौधरी, स्थानिक पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या आरक्षण प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, विशेषतः महिलांसाठी आरक्षित जागांच्या वाढीमुळे महिला सहभाग वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


सोडतीनुसार प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे —


प्रभाग क्र. १: (अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. २: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. ३: (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. ४: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. ५: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण (उघड प्रवर्ग)


प्रभाग क्र. ६: (अ) ना.मा.प्र. महिला, (ब) सर्वसाधारण


प्रभाग क्र. ७: (अ) ना.मा.प्र. महिला, (ब) सर्वसाधारण


प्रभाग क्र. ८: (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण


प्रभाग क्र. ९: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण


प्रभाग क्र. १०: (अ) ना.मा.प्र., (ब) सर्वसाधारण



या आरक्षण प्रक्रियेत महिलांसाठी दहा पेक्षा अधिक जागा राखीव झाल्या असून, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे येत्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासह एकूण अकरा महिला प्रतिनिधी नगरपरिषदेत निवडून येण्याची शक्यता आहे.


सोडतीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडल्याने नागरिक व विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.