हज्जन मेहरुन्निसा बी. यासीन खान यांचे निधन
हज्जन मेहरुन्निसा बी. यासीन खान यांचे निधन
लेवाजगत न्युज न्हावी (ता. यावल) :– न्हावी (मु. तहा नगर, फैजपूर) येथील रहिवासी हज्जन मेहरुन्निसा बी. यासीन खान (वय ९३) यांचे सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. हज्जन मेहरुन्निसा बी.यासीन खान जमा मस्जिद न्हावी येथील मुतवल्ली व एकता फाउंडेशनचे सदस्य जफर खान यासीन खान यांच्या मातोश्री होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत