महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर पुणे यांची संयुक्त संवाद सभा संपन्न
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ व लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर पुणे यांची संयुक्त संवाद सभा संपन्न
लेवा जगत न्यूज, कल्याण प्रतिनिधी :
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आणि लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (LCCIA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद सभा कै. भास्करराव महाजन सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व इंदाला शैक्षणिक संकुल, मुरबाड रोड, बापसई, कल्याण येथे रविवारी, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली.
या सभेसाठी भव्य व्यासपीठावर महासंघाचे अध्यक्ष अरुणदादा बोरोले, LCCIA अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. आर. डी. चौधरी, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. विजय महाजन, सौ. जयश्री महाजन, डॉ. पवन भोळे, डॉ. मिलिंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेश बोरोले, IAS एड. शामसुंदर पाटील, डॉ. सुनील भिरूड, डॉ. नी. रा. पाटील, सौ. नीलिमा वारके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
इंदाला समूहाचे उत्कृष्ट आयोजन
इंदाला ग्रुपचे सर्वेसर्वा डॉ. विजय महाजन यांनी त्यांच्या कॉलेजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन केले. आकर्षक सभागृह, सुसज्ज व्यवस्था आणि सुंदर परिसरामुळे वातावरण भारावून गेले.
प्रारंभी श्रद्धांजली व दीपप्रज्वलन
कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री आई बहिणाबाई व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला वंदन करून दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर समाजातील ज्ञात-अज्ञात दिवंगत बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
समाज एकत्रीकरणावर भर
महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी समाजातील विविध संस्थांनी एकत्र येऊन कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “भोरगाव लेवा पंचायत ही आपली मातृसंस्था असून, समाजाचे हित हेच आपले ध्येय असावे,” असे ते म्हणाले.
LCCIA चे डॉ. आर. डी. चौधरी यांनी समाजाला व्यवसायाभिमुख बनविण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले.
सकल लेवा गीताने भारावले वातावरण
प्रतिभाग्रज रवी पाटील यांनी स्वतः रचलेले सकल लेवा गीत सादर करून उपस्थितांना प्रेरणादायी वातावरणात नेले.
समाजातील ज्वलंत विषयांवर प्रबोधन
डॉ. प्रमोद महाजन यांनी व्यसनाधीनता, पालक व युवा प्रबोधनावर प्रभावी मार्गदर्शन केले. तर ज्ञानेश्वर पाटील व महेश बोरोले यांनी सकल लेवा संघटनाबाबत चर्चा केली.
कृष्णाजी खडसे यांनी लेवा पाटीदार समाजासाठी आदर्श विवाह आचारसंहिताचे सामूहिक वाचन करून समाजबांधवांकडून आचारसंहितेचे पालन करण्याची शपथ घेतली.
सौ. सारिका पाटील यांनी मुलींच्या पौगंडावस्थेतील जाणीवजागृतीवर प्रबोधन केले.
डिजिटल मॅगझिन व महिला सहभाग
सौ. विजया जंगले (पुणे) यांनी महासंघाचे डिजिटल मॅगझिन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्यास त्वरित मंजुरी देण्यात आली.
सौ. प्रतिभा राणे यांनी विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशनाचे महत्त्व सांगितले.
उद्योग-व्यवसायावर महाचर्चा
LCCIA तर्फे स्टार्टअप फॉर न्यू इंटरप्रेनर्स, बिझनेस नेटवर्किंग व ट्रस्ट बिल्डिंग या विषयांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेत डॉ. पवन भोळे, डॉ. विजय महाजन, दिव्यकांत नारखेडे आदी मान्यवर सहभागी झाले.
कौशल्य विकासावर भर
स्किल डेव्हलपमेंट नीड ऑफ टुडेज एम्प्लॉयमेंट या विषयावर डॉ. निळकंठ चौधरी, विकास वारके, डॉ. सुनील भिरुड आदींनी विवेचन केले.
LCCIA चे डॉ. पवन भोळे व डॉ. सुरेंद्र पाटील यांनी बिझनेस नेटवर्किंग वर पॉवरपॉइंट सादरीकरण केले.
समाजगौरव व सत्कार
समाजातील विशिष्ट प्राविण्य संपादन करणाऱ्या मान्यवरांचा महासंघ, LCCIA व इंदाला परिवार तर्फे मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारार्थींमध्ये डॉ. सुनील भिरुड (COEP VC), डॉ. नी. रा. पाटील, रूपाली ठोंबरे, महेश भारंबे, सौ. नीलिमा वारके, डॉ. विलास खर्चे, सुनील इंगळे, निलेश बढे, मधुकर भोजू चौधरी, डॉ. किरण चौधरी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. मनिषा बेंडाळे व डॉ. मिलिंद पाटील यांनी केले.
महासंघाचे सचिव दिलीप नाफडे यांनी कार्यक्रमाचा सारांश मांडला, तर डॉ. एम. एन. पाटील यांनी खुमासदार आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत