सावदा विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त काकडा आरती उत्साहात
सावदा विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त काकडा आरती उत्साहात
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी):
सावदा येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक महिन्यातील एकादशी निमित्ताने काकडा आरतीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सुरू आहे. आज एकादशीच्या शुभप्रसंगी सकाळी शहरातून काकडा आरती निमित्ताने ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली.
या प्रदक्षिणेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. भजन, टाळ-मृदंगाच्या गजरात "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" असा जयघोष करण्यात आला.
ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर, नेहमीप्रमाणे श्री विठ्ठल मंदिरात काकडा आरती करण्यात आली. आरतीच्या वेळी मंदिर परिसरात मंत्रोच्चार आणि भक्तिरसाने भारलेले वातावरण निर्माण झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत