सावद्यात आज“एक रात्र खाटू शाम के नाम” भव्य भक्ती सोहळ्याचे आयोजन!
सावद्यात आज“एक रात्र खाटू शाम के नाम” भव्य भक्ती सोहळ्याचे आयोजन!
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी, सावदा :-
सावदा शहरात आज भक्तीचा माहोल अनुभवायला मिळणार आहे. येत्या शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता “एक रात्र खाटू वाले के नाम” हा भव्य भक्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दुर्गामाता मंदिर, समोर, सावदा येथे पार पडणार असून, सुप्रसिद्ध श्याम प्रेमी गायक श्री. शिवम रावल यांच्या सुरेल आवाजात श्यामनामाचा गजर होणार आहे. भक्तांना एक आगळीवेगळी भक्तिरसाची मेजवानी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सिमरन रेखा राजेश वानखेडे, छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ आणि सर्व श्याम प्रेमी यांनी केले आहे.
कार्यक्रमास विविध संत-महंत, धर्मप्रेमी नागरिक व श्यामभक्त उपस्थित राहणार असून, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सावद्यात श्यामप्रेमाने भारलेली ही रात्र सर्व भक्तांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत